BNR-HDR-TOP-Mobile

Dapodi: विस्कळीत पाणीपुरवठा, युवासेनेने अधिका-यांना मोकळा माठ देऊन केला निषेध

एमपीसी न्यूज – दापोडी मधील अनेक भागामध्ये विस्कळीत पाणीपुरवठा आहे. युवासेना पिंपरी विधानसभा व शिवसेना शाखा दापोडी, फुगेवाडीच्या वतीने पाणीपुरवठ्याच्या अधिका-यांना मोकळा माठ देऊन याचा निषेध करण्यात आला. येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा हंडामोर्चा काढून रस्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण 100 टक्के भरले असून दापोडी व फुगेवाडी मधील नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. वारंवार दुरुस्तीचे काम सांगून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नागरिकांची दिशाभूल करत आहे. येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा शिवसेना शाखा दापोडी, फुगेवाडी व युवासेना पिंपरी विधानसभाच्या वतीने हंडामोर्चा काढून रस्तारोको केला जाईल.

यावेळी युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले, उपशहरप्रमुख तुषार नवले, विभागसंघटक निलेश हाके, विभागप्रमुख राजू सोलापुरे, शाखाप्रमुख प्रमोद शिंदे, मनोज काची, शैलेश हाके, चिंचपा निंगडोळे, सुनील साठे, अमित काटे, बिरपा चटाळे, सुनील कदम उपस्थित होते.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3