Dapodi : कोरोना संकटात विद्यार्थ्यांना फी सक्ती नको : युवा सेनेची मागणी

Don't force students to pay fees in Corona crisis: Yova Sena demands :दापोडी -फुगेवाडीतील शाळांकडे मागणी

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखू नये, तसेच फी साठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तगादा लावू नये, अशी मागणी पिंपरी युवा सेना व मैत्रीग्रुप यांच्यावतीने दापोडी -फुगेवाडीतील शाळांना करण्यात आली.

याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले. राज्यासह देशात कोरोनाचे संक्रमण मोठ्याप्रमाणात वाढत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातही कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. मार्च महिन्यात संपूर्ण देशभर कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे जवळपास अडीच ते तीन महिने कंपन्या व आस्थापना बंद होत्या. या कालावधीत अनेकांचे रोजगार गेले.

त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसमोर जगण्याचा संघर्ष सुरु आहे. अशा परिस्थितीत अनेक पालकांकडे पाठ्यपुस्तके घ्यालाही पैसे नाहीत.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आणि फी साठी त्यांच्याकडे तगादा लावू नये, अशी मागणी दापोडी -फुगेवाडीतील शाळांच्या मुख्याध्यापकांना करण्यात आल्याची माहिती पिंपरी युवा सेनेचे विभाग संघटक निलेश हाके यांनी दिली.

यावेळी मैत्री ग्रुपचे रवी कांबळे, दीपक साळवे, मेहबूब शेख, मोईन मुजावर, अतुल कांबळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.