Dapodi: विद्युत समस्या; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – दापोडी येथील पाण्याच्या टाकीवरील विद्युतची समस्या निर्माण झाल्याने आणि व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने आज (शनिवार)चा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे सुमारे तीन तास उशिराने पाणीपुरवठा होणार आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो.

दापोडी येथील पाण्याच्या टाकीवरील विद्युतची समस्या निर्माण झाली आहे. तसेच येणा-या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे आज शनिवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. सुमारे तीन तास उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.