Dapodi Crime News : दापोडीत अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला पावणे चार लाखांचा गुटखा

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला तीन लाख 70 हजार 711 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. 16) दुपारी दापोडी येथे करण्यात आली.

अमली पदार्थ विरोधी पथकातील हवालदार प्रदीप छबू शेलार यांनी शुक्रवारी (दि. 16) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिश्रीलाल समाराम परिहार (वय 40, रा. जयभीमनगर, दापोडी), गोट्या ऊर्फ शरद अगरवाल (रा. रास्ता पेठ, पुणे), सचिन कलाधर, (रा. वडारवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परिहार याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपीकडून तीन लाख 70 हजार 711 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त केला. त्याला हा गुटखा आरोपी अगरवाल आणि कलाधर या दोघांनी दिला होता.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.