Dapodi: उद्‌घाटनानंतर दोन महिन्यातच ‘हॅरिस’ब्रीज’च्या खर्चात 70 लाखांची वाढ

एमपीसी न्यूज – दापोडीतील हॅरिस पुलाला बांधण्यात आलेला समांतर पुलाच्या खर्चात वाढ झाली आहे. उद्‌घाटनाच्या अवघ्या दोन महिन्यातच पुलाच्या खर्चात तब्बल 70 लाखांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुलाचा खर्च 22 कोटी 46 लाखांवरुन 23 कोटी 15 लाख 70 हजार रुपयांवर पोहचला आहे. वाढीव खर्चाचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि. 7) होणा-या स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

मुंबईतील वालेचा इंजिनीअरिंग या ठेकेदाराला 22 कोटी 46 लाख रुपयांमध्ये हॅरीस पुलाचे काम दिले होते. 23 मे 2016 रोजी ठेकेदाराला वर्क ऑर्डर (कार्यरंभ) आदेश दिला होता. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे. तसेच, पुण्याकडील पोच रस्त्याची 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे.

  • पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते 3 जून 2019 रोजी पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. तेव्हापासून पुल वापरात आहे. मात्र, उद्‌घाटनानंतर केवळ दोन महिन्यातच पुलाच्या खर्चात वाढ झाली आहे. पुलाच्या खर्चात तब्बल 69 लाख 37 हजार रुपयांची वाढ झाली असल्याचे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने म्हटले आहे.

पुणे पाटबंधारे विभागाने सुचविलेल्या बदलांमुळे तसेच दोन्ही पुलांचे अन्त्यस्तंभ ओपन फाऊंडेशन ऐवजी ‘पाईल’ फाऊंडेशनमध्ये करण्यात आल्यामुळे पुलाच्या खर्चात 69 लाख 37 हजार रुपयांची वाढ झाल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला आहे. त्यामुळे पुलाचा खर्च सुमारे 22 कोटी 46 लाखांवरुन 23 कोटी 15 लाखांवर पोहचला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like