BNR-HDR-TOP-Mobile

Dapodi : काँग्रेसतर्फे शहीद भगतसिंग यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने शहीद दिनानिमित्त भगतसिंग यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस वीरेंद्र गायकवाड, अनिकेत अरकडे, सिध्दार्थ वानखेडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अनिल सोनकांबळे, सैज्जाद शेख, जाहीदअली सैय्यद, रोहीत यादव उपस्थित होते.

शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या शहीदांचे शौर्य कायम तरूणांना देशप्रेमाची व प्रसंगी बलिदानाची प्रेरणा देणारा पराक्रमाचा इतिहास आहे. हा इतिहास आजच्या युवा भारतात समस्त तरूणाईला समजण महत्वाचे आहे. त्यातूनच असंख्य देशभक्त युवा देशकार्यात स्वत:ला झोकून देतील. भारत देश हा अधिक समृद्ध देश होईल, असे नरेंद्र बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3