Dapodi : दापोडी येथे बारा बलुतेदारांचा संविधान देऊन जाहीर सन्मान

एमपीसी न्यूज – प्रबोधन प्रतिष्ठान दापोडी व बाराबलुतेदार समाजाच्या वतीने स्वातंत्रसूर्य विर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम दापोडी येथे पार पडला. कार्यक्रमात बारा बलुतेदारांचा संविधान देऊन जाहीर सन्मान करण्यात आला.

शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्राध्यापक प्रकाश पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर जाधव, बारा बलुतेदार प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान दिले. अनिल कातळे प्रमुख पाहून म्हणून उपस्थित होते.

तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाचे सचिव विशाल वाळुंजकर, इक्रा इंग्लिश स्कूलचे संचालक उमेर गाजी, भाऊसाहेब मुकुटमल, प्रदीप वाळुंजकर, गणेश शिंदे, पुंडलिक सैंदाणे, प्रकाश तिरलापुरकर, अशोक मगर, चंद्रकांत काटे, चंद्रकांत बाराथे, इमामभाई शेख, संतोष सपकाळ, अमीर शेख, राहुल सोनवणे, नरेश आनंद, प्रकाश सोनवणे, डॉ. प्रमोद कांबळे, डॉ. विजय बलाढ्ये, विशाल वाळुंजकर, बाबासाहेब दुपारगुडे आदी उपस्थित होते.

प्रबोधन प्रतिष्ठान दापोडी, इक्रा शिक्षण संस्था दापोडी, सजग नागरिक सामाजिक संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारा बलुतेदारांचा भारतीय संविधान देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. प्रा. प्रकाश पवार यांनी ‘भारतीय समाजासमोरील आव्हाने आणि भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यान दिले.

प्रा. प्रकाश पवार म्हणाले, “संविधान दिनाबाबत आपण 60 वर्षे अनभिज्ञ होतो. संविधानाचे लाभधारक होतो, पण ते माहीत नव्हते. समतेचा विचार पुढे नेण्यासाठी 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरा करण्यात येतो. संविधानाचे महत्त्व सांगितले जाते. या देशात जबाबदार नागरिकचे संविधानाचे रक्षण करू शकतात. बेजबाबदार नागरिक ते तोडण्याचे काम करतात. आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे शिक्षण दिले पाहिजे.

शेतीला जशी पाण्याची गरज असते तशी माणसाला शिक्षणाची गरज असते. स्वातंत्र्यानंतर मुलींना, गोरगरीबांना आणि अल्पसंख्यांकांना दहा वर्षे दर्जेदार शिक्षण दिलं असतं तर हा देश बदलून गेला असता. केवळ त्यावेळी दर्जेदार शिक्षण दिले नाही, म्हणून आज लोकसंख्या 125 कोटीच्या पुढे आहे. त्यामुळे देश रसातळाला पोहोचला आहे. फुले आंबेडकरांचे विचार निर्णयप्रक्रियेत येत नाहीत तोपर्यंत सुधारणा होणार नाहीत. संविधान जगले तर सामान्य माणूस उभा राहील. यासाठी संविधान समजून घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

प्रकाश सोनवणे यांनी प्रस्ताविक केले. गोरख ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले. सलीम शेख यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like