Dapodi : हुतात्मा भगतसिंग शाळेची इमारत पाडणार

नवीन इमारत बांधण्यासाठी सात कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेची इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे ती इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सात कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम यशराज ग्लोबल इन्फ्राकॉन एलएलपी यांच्याकडून करुन घेण्यास स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

महापालिकेची दापोडीत हुतात्मा भगतसिंग शाळा आहे. या शाळेची इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे जुनी इमारत पाडण्यात येणार आहे. नवीन इमारत बांधली जाणार आहे. महापालिकेने निविदा मागविली होती. निविदा रक्कम आठ कोटी 25 लाख 63 हजार 829 रुपये होते. निविदा प्रक्रियेत सात ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये यशराज ग्लोबल इन्फ्राकॉन 11.22 टक्के कमी , टेक्सन बिल्डर्स 7.92 टक्के कमी, ए.जी. असोसिएट्स 0.99 टक्के कमी, ए.आर. नायडू 3.11 टक्के जादा, राहुल कन्स्ट्रक्शन 3.50 टक्के जादा, साईप्रभा कन्स्ट्रक्शन 5.00 टक्के जादा आणि एस.एस.साठे 8.10 टक्के जादा दराच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या.

त्यापैकी यशराज ग्लोबल इन्फ्राकॉन एलएलपी या ठेकेदाराची निविदा रकमेच्या आठ कोटी 25 लाख 63 हजार 829 मधून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून आठ कोटी 23 लाख पेक्षा 11.22 टक्के कमी दराची आहे. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची आणि ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही निविदा स्वीकारण्यास 4 जानेवारी 2020 रोजी मान्यता दिली. ग्लोबल इन्फ्राकॉन एलएलपी यांच्याकडून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेससह सात कोटी 33 लाख रुपयांमध्ये करुन घेण्यास आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.