Pimpri: दापोडी, कासारवाडी आजपासून ‘सील’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आज रात्री 11 वाजल्यापासून दापोडी, कासारवाडी  परिसर सील करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा भाग सील असणार आहे. कालपासू भोसरीतील काही भागही सील केला आहे. दरम्यान, पाच दिवसांपुर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला आहे. आजपर्यंत सात भाग सील केले आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा भाग सील केला आहे.

सील करण्यात आलेला भाग!

विनियर्ड चर्च परिसर, दापोडी (माता शितळादेवी चौक – विनियर्ड चर्च – सुखवानी ग्लोरी – पब्लिक फुड शेल्टर – धुम स्टार मेन्स पार्लर – पिंपळेगुरव रोड – माता शितळादेवी चौक) व डायमंड प्लास्टिक कंपनीजवळ कासारवाडी (सिध्दार्थ मोटार कासारवाडी – दत्तमंदीर – पिंपळे भारत गॅस – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सीएमई बॉन्ड्री – सिध्दार्थ मोटार कासारवाडी)

चांदणी चौक (पी.एम.टी. चौकाजवळ), भोसरी (पुजा टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स – भोसरी मेन रोड – मॅन्जिनिस केक शॉप – मेघना सोनोग्राफी सेंटर – लांडेवाडी रोड – पि चिंमनपा भोसरी करसंकलन कार्यालय – भगवान गव्हाने चौक – लोंढे गिरणी हा भाग देखील कालपासून सील केला आहे.

दरम्यान, पाच दिवसांपुर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील सात परिसर सील केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.