Dapodi: ‘तेरा दूध का धंदा जोर से चल रहा है..मुझे पैसे दे’, असे म्हणत चाकूचा धाक दाखवून एकास लुटले

Dapodi: milkman robbed one by showing fear of knife आरोपी गणेशने शेख व त्यांच्या 16 वर्षांच्या मुलास चाकूचा धाक दाखवला.

एमपीसी न्यूज- चाकूचा धाक दाखवून ‘तेरा दूध का धंदा जोर से चल रहा है..मुझे पैसे दे’ असे, म्हणत एका व्यक्तीच्या खिशातून पैसे काढून घेऊन आरोपी पळून गेल्याचा प्रकार दापोडी येथील जयभीमनगर येथे मंगळवारी (दि.7) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

याप्रकरणी फराहीन तवारफ शेख (वय 52, रा. गुलाबनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी गणेश विष्णू आडागळे (वय 28, रा. गुलाबनगर, दापोडी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा सोळा वर्षांचा मुलगा दूध घेण्यासाठी दापोडी रेल्वे फाटककडे जात होते.

यावेळी आरोपी गणेशने शेख व त्यांच्या 16 वर्षांच्या मुलास चाकूचा धाक दाखवून ‘तेरे जेब में कितने पैसे है, उतने निकाल, तेरा दुध का धंदा जोर से चल रहा है, मुझे पैसे दे’ असे, म्हणत मुलाच्या पँटच्या खिशात हात घालून दोन हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.