Dapodi News: महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांची स्थापना

एमपीसी न्यूज – मकर संक्रांतीचे औचित्य साधत दापोडीत महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड यांच्या पुढाकारातून विविध महिला बचत गटाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यासोबतच किराणा साहित्यासह भेटवस्तूंचे महिलांना वाटप करण्यात आले.

एकी नसल्याने दापोडी परिसर, भाजीमंडई बोर्डाची सुधारणा झाली नाही. आजूबाजूच्या परिसराची सुधारणा झाली परंतु, दापोडीत सुधारणा झाली नाही. वॉर्डात एकी नसल्याचा सगळ्यांनी फायदा घेतला आहे. मात्र यापुढे मी सर्वांना एकत्र आणण्याचा विविध कार्यक्रमातून प्रयत्न करेल. त्यातून आपल्या वॉर्डाचा विकास साधून आणला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

दापोडी रेल्वे मैदानावरील आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. यावेळी भूमिका महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, सावित्रीबाई महिला बचत गट या महिला बचत गटांची सुरुवात करण्यात आली.

उद्योजक नितीन गायकवाड, अस्मिता कांबळे, अशोक गायकवाड, विशाल जाधव, रमेश उप्पार, आलोक गिरणे, रूपेश भालेराव, मन्सूर महबूब नदाफ, अशित कांबळे, अमित मसेकर, रोहन गायकवाड , गिरीश घाडगे, अनूप मॅथ्यू, अक्षय साळूंके, वाहिद कुरेशी, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1