Dapodi News: पत्रकार किशोर मनतोडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पत्रकार किशोर मनतोडे (वय 59) यांचे आज (रविवार) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन असा परिवार आहे.

मनतोडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दै. केसरीमध्ये खडकी प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत होते. गेल्या २० वर्षांपासून ते खडकी कॅन्टोन्मेट बोर्ड, बोपोडी – दापोडी या परिसरात विविध वृत्तपंत्रासांठी वार्तांकन करीत होते.

दै. पुढारी व सामनामध्येही त्यांनी काही काळ खडकी वार्ताहर म्हणून काम केले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.३०) दुपारी दापोडीतील ख्रिस्ती दफनभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.