Dapodi News : युवा सेनाच्यावतीने वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

एमपीसीन्यूज : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shivsena Chief Balasaheb Thackeray) जयंतीनिमित्त पिंपरी युवा सेनेच्या ( Pimpri Yuva Sena) वतीने गणेशनगर दापोडी येथे वृक्षारोपण ( Tree plantation) करण्यात आले. यानिमित्त युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.

पिंपरी युवा सेनेचे विभाग संघटक निलेश हाके, अविनाश जाधव, गणेश काटे, शंकर शेंडगे, सूरज शिं गोटे, सुनील यादव, अब्बास शेख, साहिल लोहा, अविनाश कांबळे आदी या वेळी उपस्थित होते. निलेश हाके यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तत्पूर्वी शिवसेना दापोडी शाखेत उपविभाग प्रमुख एकनाथ हाके यांच्याहस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदाशिव जगताप, अंकुश जाधव, रूपेश गायकवाड, श्रीकांत शेवाळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.