Dapodi News : पेट्रोल दरवाढ विरोधात मनसेची स्वाक्षरी मोहिम 

एमपीसी न्यूज – पेट्रोल दरवाढ कमी करा तसेच, गॅसची थकित सबसिडी मिळावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. सोमवारपासून (दि.8) गणेश नगर, दापोडी येथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मनसेचे उपविभाग प्रमुख अलेक्सझांडर मोझेस, सतीश मथमर्थी, सागर भेगडे, सागर भोकरे, शुभम सटतालु, दिलीप ठोंबरे, अनिल गायकवाड विक्रम शेळके, प्रशांत सांगळे, अनिल काची, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

‘सरकारने गॅस सबसिडी देणे बंद केले आहे. तसेच, पेट्रोलची दरवाढ करण्यात आली आहे. सरकारने पेट्रोल दरवाढ कमी करा तसेच, गॅसची थकित सबसिडी मिळावी’ अशा आशयाचे पत्र तयार करण्यात आले असून, यावर नागरिकांची स्वाक्षरी घेऊन हि पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.