Dapodi News : दापोडी ते बोपोडी पूल रस्ता विकसित करण्यासाठी पावणे सहा कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बोपोडी पूल रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्याकामी येणाऱ्या 5 कोटी 83 लाख इतक्या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिके मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी आरक्षण क्रमांक 77 येथे निवासी गाळे बांधण्याकामी येणा-या 1 कोटी 45 लाख 14 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 6 मध्ये पूर्व भागात खड्डे व चरांची डांबरीकरणाचे सुधारणा करण्याकामी येणाऱ्या  27 लाख 28 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

वैद्यकीय विभाग कोविड-19 कामकाजाकरीता शासनाकडील नोंदणीकृत संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्याबाबत 50 कोविड लसीकरण केंद्राकरीता 50 स्टाफनर्स 25 डेटाएन्ट्री ऑपरेटर 25 वॉर्डबॉय वार्डआया असे एकूण 100 कुशल अकुशल मनुष्यबळाची 2 महिने कालावधी करीता करारनामा करुन नेमणूक करण्याकामी येणाऱ्या 50 लाख 81 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 16 वाल्हेकरवाडी येथे प्राधिकरण कडून आलेल्या जागेवर शाळा इमारत बांधण्याकामी येणा-या 9 कोटी 61 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेचे “अ”,“ब”,“क”,“ड”,“इ”,“फ” “ग” व “ह” क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते/गटर्स साफसफाई करणेकामी किमान वेतन दराने कामगार उपलब्ध करणे याकामासाठी 2 वर्ष कालावधीसाठी किमान वेतनावरील सेवा शुल्कावर निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार 8 क्षेत्रिय कार्यालयाकडे किमान वेतन दरानुसार 6 संस्थांमार्फत 1529 सफाई कामगार पुरविण्यात आलेले आहे. त्याकामासाठी किमान 2 महिने कालावधीकरीता तथा निविदा प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल यापैकी जे प्रथम होईल तोपर्यंत मुदतवाढ देवून याकामी येणाऱ्या 7 कोटी 10 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी साथरोगाची आपत्तीजनक स्थितीचा सामना करणेकामी 800 अ‍ॅन्टीजेन टेस्ट किट्स खरेदी करण्याकामी येणाऱ्या 50 लाख 30 हजार, ग प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई करणे आणि चोकअप काढण्याच्या कामासाठी येणा-या 1 कोटी 16 लाख इतक्या खर्चास, ड प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई करणे व चोक अप काढण्याच्या कामासाठी येणाऱ्या 32 लाख 77 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी मधील लोकमान्य टिळक शाळा विस्तारीकरण करण्याकामी येणाऱ्या 2 कोटी 58 लाख, प्रभाग क्रमांक 20 मधील महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी समोरचा नाला विकसित करण्याकामी येणाऱ्या 1 कोटी 14 लाख, संत ज्ञानेश्वर उद्यान प्राधिकरण निगडी देखभाल करण्याकामी येणाऱ्या 44 लाख 73 हजार, प्रभाग क्रमांक 10 मधील शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागे शाहू सृष्टीचे उर्वरित कामे करण्याकामी येणा-या 5 कोटी 55 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांमध्ये MPLS द्वारे इंटरनेट कनेक्टीव्हिटी करण्याकामी येणाऱ्या 68 लाख 21 हजार, महापालिकेच्या विविध रुग्णालये, कोविड केअर सेंटर ई. ठिकाणी कोरोना विषाणुबाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारे इजेंक्शन इनोक्सोपॅरीन सोडीयम 40 खरेदी करणेकामी येणाऱ्या 81 लाख 50 हजार, प्रभाग क्रमांक 30 दापोडी कासारवाडी मधील रेल्वेगेट सर्वे नं.498 ते सर्वे नं. 485 पर्यंत वरुण हॉटेल पाठीमागील रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्याकामी येणाऱ्या 1 कोटी 19 लाख 28 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.