Dapodi : रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेखाली सापडून इसमाचा मृत्यू झाला. ही घटना दापोडी येथे बुधवारी (दि. 16) सकाळी घडली.

भगवान गोपीनाथ गायकवाड (वय 45, रा. वॉर्ड नंबर 5, बोपोडी) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी लोणावळाहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेखाली सापडून दापोडी येथे इसमाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे असलेल्या डायरीतील क्रमांकावरून मृत व्यक्‍तीची ओळख पटली. याबाबत अधिक तपास पुणे रेल्वे पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.