Dapodi : गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात अहोरात्र सेवा करून दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी भागातील गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

भोसरी पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला भाजपा प्रभाग अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, विशाल सातपुते, सुधीर चव्हाण, महिला आघाडी अध्यक्षा जयश्री नवघिरे, राजू कानडे, अरुण साळवे उपस्थित होते. भाजपा सचिव विशाल वाळुंजकर, ह्यूमन सोशल राईटस असोसिएशन प्रदेश अध्यक्ष कैलास बनसोडे यांच्या हस्ते भोसरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन विशाल सातपुते यांनी केले. आभार अरुण साळवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.