Dapodi : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फुगेवाडी परिसरात औषध फवारणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी फुगेवाडी, संजयनगर परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. तसेच घरचे प्रवेशद्वार, सार्वजनिक बसण्याची ठिकाणे तसेच आजूबाजूचा परिसरात औषध फवारणी करण्यात आली.

याप्रसंगी माजी नगरसेविका संध्या गायकवाड, शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद शिंदे, महिला कार्यकर्त्या रेखा पटेल, छाया गायकवाड, शिवतुफान मित्र मंडळाचे कार्यकर्ते युवराज गायकवाड, जयेंद्र डिग्गीकर, योगेश मिरपगार, रोहित जाधव आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याअनुषंगाने औषध फवारणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.