Dapodi : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने (Dapodi) विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 25) दुपारी दापोडी येथे घडली.

साक्षी राम कांबळे (वय 18, रा. दापोडी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर झाला. त्यापूर्वी साक्षी घरातून जेवण करून निकाल पाहण्यासाठी बाहेर पडली. काही वेळेनंतर ती निकाल पाहून घरी आली. तिला परीक्षेत अपयश मिळाल्याचे तिने घरच्यांना सांगितले.

Devendra Fadnavis : आमचे सरकार वेगाने निर्णय घेणार- देवेंद्र फडणवीस

घरच्यांनी देखील तिच्यावर कुठलाही दबाव आणला नाही. काही हरकत नाही, पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दे, असे तिच्या वडिलांनी समजावून सांगितले. त्यानंतर ती घरात वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली. तिथे तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास लाऊन घेतला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घरच्यांनी तिला तत्काळ उपोचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित (Dapodi) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.