Dapodi: 10 महिन्यांपासून वेतन न दिल्याने यूपीतील सुपरवायझरची आत्महत्या

Dapodi: Supervisor commits suicide due to non-payment of salary for 10 months आत्महत्येपूर्वी रवींद्र यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ठेकेदार पगार देत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

एमपीसी न्यूज- गेल्या दहा महिन्यांपासून ठेकेदार पगार देत नसल्याने एका 45 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दापोडी येथील सीएमई गेट परिसरात घडली. रवींद्र प्रताप सिंह (वय 45, रा. सीएमई गेट, दापोडी, मूळ-उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आत्महत्येपूर्वी रवींद्र यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ठेकेदार पगार देत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पगाराचे पैसे त्याच्याकडून मिळवून आपल्या कुटुंबाला द्यावेत आणि ठेकेदारावर कार्यदेशीर कारवाई करावी, असेही त्यात म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रवींद्र प्रताप सिंह हे गेल्या एक वर्षापासून दापोडी येथील सीएमई गेट मधील परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी शर्मा नावाच्या ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम पाहत होते.

मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून या ठेकेदाराने पगारच दिला नाही. त्यामुळे तणावात येऊन गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सीएमई गेटमध्ये कामगारांसाठी तात्पुरते पत्रा शेड उभारले आहे. तिथे गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.