Dapodi : मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून दुचाकी चोरीला

The bike was stolen from the entrance of the Military Engineering College

एमपीसी न्यूज – दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) गेट जवळून अज्ञात चोरट्यांनी एक दुचाकी चोरून नेली. ही घटना 22 मार्च रोजी रात्री सात ते अकरा या कालावधीत घडली आहे. याबाबत 1 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत साधू कांबळे (वय 55, रा. सिद्धांतनगर, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांनी त्यांची बजाज कंपनीची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 / बीजी 2696)  दापोडी येथील सीएमईच्या गेट जवळ जुना मुंबई-पुणे महामार्गावर पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.