-MPC-TOP-MOST-BANNER-I

Dapodi : देखभाल आणि दुरुस्तीसाठी दापोडी रेल्वे फाटक तीन दिवस बंद राहणार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – देखभाल आणि दुरुस्तीसाठी दापोडी रेल्वे फाटक मंगळवार (दि. 28) पासून तीन दिवस बंद राहणार आहे. याबाबत मध्य रेल्वे आणि पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

दापोडी येथे रेल्वे विभागाकडून खडी, स्लीपर्स, रेल्वे रूळ बदलण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी मंगळवार (दि. 28) सकाळी नऊ ते गुरुवार (दि. 30) सायंकाळी सात या कालावधीत दापोडी रेल्वे फाटक बंद राहणार आहे.

वरील कालावधीत वाहन चालकांनी दापोडी रेल्वे फाटककडे न जाता सरळ पुढे पुणे-मुंबई महामार्गाने फुगेवाडी चौकातून डावीकडे वळून दापोडी गावातून इच्छित स्थळी जावे. तसेच दापोडी गावातून फुगेवाडी चौकात येऊन इच्छित स्थळी जावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.