Dapodi : दारू पिताना झालेल्या भांडणातून तरुणाचा खून;दोन दिवसात दोन खून

The murder of a young man over a drinking quarrel; Two murders in two days

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या भांडणात एका तरुणाचा त्याच्या मित्रांनी दगडावर डोके आपटून खून केला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 18) दुपारी चार वाजताच्या सुमारास दापोडी येथे पवना नदीच्या पात्रात हॅरिस ब्रिजखाली घडली.

अजय शशिकांत सूर्यवंशी (वय 30, रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अजय हा आपल्या तीन मित्रांसह दापोडी येथील पवना नदीवर असलेल्या हॅरिस पुलाखाली दारू पिण्यासाठी बसला होता.

त्यावेळी अजय आणि त्यांच्या मित्रांमध्ये भांडण झाले. चिडलेल्या मित्रांनी अजयचे डोके दगडावर आपटले. यात अजय गंभीर जखमी झाला आणि त्यातच अजयचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भोसरी पोलिसांचे एक पथक आरोपींच्या मागावर रवाना झाले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत. मागील दोन दिवसातील दापोडीतील ही खूनाची दुसरी घटना आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.