Dapodi : फुकट कॅडबरी दिली नाही म्हणून बेकरीची तोडफोड करत तीन हजार हिसकावले

एमपीसी न्यूज – फुकट कॅडबरी दिली नाही (Dapodi) म्हणून बेकरीची तोडफोड करत बेकरीमधून तीन हजार रुपये हिसकावून नेले. हा प्रकार दापोडी येथील जयभारत स्वीट येथे बुधवारी (दि.24) रात्री घडला.
याप्रकऱणी नरेश गुलाबराव सबनानी (वय 44 रा. काळेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अब्दूल बबलू शेख उर्फ शाहरूख (रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
Nigdi : पर्यावरणाच्या ऱ्हासास श्रीमंत देश जबाबदार -डॉ. सुरेश बेरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा कामगार बेकरीत काम करत असताना आरोपी तेथे आला व त्याने फुकट कॅडबरी मागितली. फिर्यादीने त्याला नकार दिला.यावरून चिडून आरोपीने शिवीगाळ करत दगडाने बेकरीची काच फोडली व फिर्यादीला ढकलून देत गल्ल्यातील तीन हजार रुपये काढून घेतले. यावरून आरोपीला अटक केली असून भोसरी पोलीस पुढील तपास (Dapodi) करत आहेत.