Dapodi : सीएमईमध्ये पूल बांधणीच्या सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू; पाच जवान जखमी

एमपीसी न्यूज – दापोडी येथील मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) सैनिकांच्या पूल बांधणीच्या सरावादरम्यान अपघात झाला. त्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला असून पाच जवान जखमी झाले आहेत. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) सकाळी घडली.

नायक भिवा खंडू वाघमोडे (वय २८, रा. दौंड) आणि हवालदार संजीवन पी.के. (वय २९, रा. केरळ) अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत.

मेजर सूर्यजित सिंग, सुभेदार पी शंमुग्म, नायक डीसी शर्मा, हवालदार परमजीत सिंग, नायक गुरपीत सिंग यांच्यावर खडकी लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नायक गोरे बीपी, नायक शरद खोले, नायक देवेंद्र सिंग बिष्ट यांच्यावर पुणे येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नायक मंदीप सिंग या जवानावर सीएमई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दापोडी येथील सीएमईमध्ये सैनिकांचा पूल बांधणीचा सराव सुरु होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास सराव सुरु असताना अपघात झाला. यामध्ये पूल बांधणीसाठी वापरले जाणारे साहित्य जवानांच्या अंगावर पडले. यामध्ये नऊ जवान अडकले. जवानांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.

या घटनेत पाच जवान जखमी झाले आहेत. तर हवालदार संजीवन पीके आणि नायक भिवा खंडू वाघमोडे या दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, इतर जखमी जवानांना खडकी येथील सैन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सविस्तर बातमी :
Dapodi : सीएमईमध्ये ‘पूल बांधणी’च्या सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू; नऊ जवान जखमी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.