Dapodi : घोडागाडी मधून जाणा-या दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – कार्यक्रमाची मिरवणूक झाल्यानंतर दोघेजण घोडागाडी घेऊन जात असताना चार जणांनी घोडागाडी अडवून दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री अकराच्या सुमारास दापोडी येथील बुद्धविहार जवळ घडली.

एजाज निसार शेख (वय 18, रा. डेक्कन जिमखाना, पुलाची वाडी, पुणे) या तरुणाने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याचा घोडागाडीचा व्यवसाय आहे. बुधवारी तो आणि त्याचा कामगार मित्र अनिल ढगे दापोडी येथे मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी आले होते. मिरवणूक झाल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास घोडागाडी घेऊन ते परत घराच्या दिशेने जात होते. दापोडी येथील बौद्धविहार जवळ आले असता चार जणांनी शेख याची घोडागाडी अडवली. चौघांनी मिळून विनाकारण शेख आणि त्याच्या कामगार मित्राला हातातील लोखंडी कडे आणि दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.