Dapodi : विनियार्ड चर्चमध्ये मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज –  मतदान हा प्रत्येक भारतीयांचा मूलभूत हक्क (Dapodi)आहे,तो बजावण्यासाठी सर्वांनी 13 मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क बजावावा आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन दापोडी येथील विनियार्ड वर्कर्स चर्चचे संस्थापक पास्टर डॉ. पीटर सिलवे आणि पास्टर डॉ.जयश्री सिलवे यांनी केले.

रविवारी प्रार्थनेसाठी 12 हजारांपेक्षा अधिक नागरिक जमले होते. त्यांना मार्गदर्शन करताना पास्टर डॉ. पीटर सिलवे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत 100 टक्के मतदान करून लोकशाही उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी सर्वांना मतदानाची शपथही दिली. यावेळी पिंपरी विधानसभेचे नोडल अधिकारी मुकेश कोळप आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची (Dapodi)टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

त्या अनुषंगाने 13 मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात मतदार जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून दापोडी येथील विनियार्ड चर्चच्या रविवारच्या सभेचे औचित्य साधून मावळ मतदार संघातील ख्रिस्ती बांधवांशी मतदान जनजागृतीसाठी संवाद साधण्याचे आयोजन करण्यात आले होते.

Talegaon : बोलताना अथवा लिहिताना भाषेचा आणि व्याकरणाचा अभ्यास असणे आवश्यक आहे – वैभव जोशी

यावेळी उपस्थित हजारो बांधवांनी “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेतली आणि मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला. तर, विनियार्ड चर्चने नेहमीच विविध माध्यमातून विविध लोकजागृतीचे कार्य केले आहे व करीत असल्याचा संदेश आजच्या कार्यक्रमातून पास्टर डॉ.पीटर सिलवे यांनी जनसमुदायास दिला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.