Dapodi: दुर्घटनेत दोषी कोण?, सल्लागारावर काय कारवाई केली?; महासभेत नगरसेवकांचा सवाल

एमपीसी न्यूज – दापोडी दुर्घटना कशी झाली?, या दुर्घटनेत दोषी कोण आहे? महापालिकेने कोणावर कारवाई केली? याची अद्यापही ठोस माहिती नाही?, सल्लागारावर काय कारवाई केली? असा सवाल करत दापोडी दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारासह सल्लागाराला दोषी धरण्यात यावे. त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी आज (शुक्रवारी) महासभेत केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत करण्याचीही मागणी केली.

दापोडीत महापालिकेच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू होते. काम करत असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात महापालिका अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि ढिगाऱ्याखाली अडकल्याने नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.1) दापोडी येथे घडली. या घटनेचे पडसाद आज झालेल्या महासभेत उमटले.

यावेळी राष्ट्रवादीचे दत्ता साने म्हणाले, ”दापोडी दुर्घटनेत महापालिका अग्निशमन दलाचा एका जवान आणि एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना कशी घडली? कोणामुळे घडली?, कंत्राटदाराने सुरक्षीततेच्या आवश्यक त्या उपाययोजना केल्या नव्हत्या का?, यामध्ये नक्की दोषी कोण आहे? याचा उलघडा अद्यापही झाला नाही. कोण अधिकारी जबाबदार आहे?. या घटनेबाबत अधिकारी टोलवाटोलवीची उत्तर देतात. मृतांच्या कुटुबियांना तातडीने आर्थिक मदत करावी”.

भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, “‘महापालिका कामाच्या ०.65 टक्के रक्कम देऊन कामासाठी सल्लागार नेमते. दापोडीतील कामाचा सल्लागार नेमके काय काम करतो. काम सुरू असताना काय उपाययोजना कराव्यात, याकडे सल्लागाराने का लक्ष वेधले नाही. दापोडी दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण, या लोकांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार आहे. दापोडीतील दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, सुरपरवाझरवर कारवाई केली. परंतु, सल्लागारावर काय कारवाई केली. संबंधित सल्लागाराला दोषी धरावे. त्याच्यावर कारवाई करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.