Dapodi : नातसून असल्याचे सांगत घरात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – नातसून असल्याचे सांगत कुलूप तोडून घरात बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दापोडी येथे घडली.

अंजनाबाई निवृत्ती रावडे (वय 80, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्षा कमलाकर कांबळे (सध्या रा. सिद्धार्थनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंजनाबाई यांचा नातू शुभम शेखर रावडे याचे लग्न झालेले नसतानाही आरोपी वर्षा हिने त्याची पत्नी म्हणून खोटे सांगून 20 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत फिर्यादी अंजनाबाई यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घराचा अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.