BNR-HDR-TOP-Mobile

Dapodi : विद्यार्थ्यांनी जाणून घेतली बँकेच्या कामकाजाची माहिती

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाची माहिती व्हावी, या उद्देशाने दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेतील वीर महाराणा प्रताप स्काऊट पथकाच्या वतीने नुकतेच ‘अल्पबचत’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, दापोडी शाखेचे वरिष्ठ सहायक महाव्यवस्थापक एस के व्दिवेदी, वरिष्ठ प्रबंधक राहुल आगरवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रशालेच्या प्रभारी प्राचार्या अंजली घोडके, पर्यवेक्षक सुभाष गारगोटे उपस्थित होते. बँकेचे कामकाज आणि अल्पबचत म्हणजे काय ? आणि विद्यार्थीदशेपासूनच बचतीची सवय लागली, तर भविष्यात त्याच्याकडून आर्थिक साक्षरता जोपासली जाईल या विषयी आपले विचार व्दिवेदी यांनी मांडले. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक विश्वास जाधव, सुखदेव शिंदे, अनिरूद्र काळेल उपस्थित होते.

आगरवाल यांनी विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्यांचे पैसे त्यांच्या बचत खात्यात जमा होण्यासाठी आधार लिंक होणे गरजेचे आहे व त्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. स्काऊट शिक्षक मिलिंद संधान यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभागप्रमुख अनिल पाटील यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like