Dapodi : सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून तरूणावर चाकूने वार

0

एमपीसी न्यूज –  सहा महिन्यापुर्वी सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरूणाला लोखंडी सळई व चाकूने, लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या अन्य  दोघांनाही मारहाण करण्यात आली.

हा प्रकार दापोडी येथे नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

याप्रकरणी विशाल उर्फ महाद्या गोरख कदम (वय-25), रोहन ऊर्फ पप्या लिंगे (वय-21), अभिषेक शशिकांत देशपांडे (वय-22), अंकित कदम (वय-22) यांना अटक केली आहे. तर ओमकार ऊर्फ सोन्या लिंगे (वय-23), राहूल भोसले (वय-21, सर्व रा. दापोडी) हे दोघे फरार आहेत.

याप्रकरणी राहूल चंद्रकांत काटे (वय-36, रा. दापोडी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल काटे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ अमोल याचा सहा महिन्यापुर्वी आरोपी विशाल काटे याच्या टपरीवर सिगारेट घेताना सुट्या पैशांवरून वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी अमोलला जिवे मारण्यासाठी त्याच्या डोक्यात लोखंडी सळई, हातावर चाकूने वार करून लाथाबुक्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले.

त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या राहूलच्या गळ्यावर आरोपी राहूल भोसलेने चाकू लावला. तर शैलेश काटे  याला रोहन लिंगे, अभिषेक देशपांडे यांनी पकडून ठेवले. भोसरी पोेलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like