Dapodi ; दापोडी रेल्वे स्थानकावर आग; लोकल लेट

एमपीसी न्यूज – दापोडी रेल्वे स्थानकावर आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे पुणे-लोणावळा लोकल आणि अन्य रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.दापोडी रेल्वे स्थानकावरील बँक अप हाऊसला शुक्रवारी (दि. 4) रात्री सात वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य केंद्रातून दोन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशमन विभागाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे पुणे-लोणावळा आणि लोणावळा-पुणे मार्गावर धावणा-या काही लोकल उशिराने धावत आहेत. रात्री पुणे स्थानकावरून 7.05 वाजता सुटणारी लोकल शिवाजीनगर स्थानकावर अडकून पडली आहे. त्यामुळे पुढील लोकलला देखील विलंब होण्याची शक्यता आहे. आग आटोक्यात येताच लोकल सोडण्यात येणार आहे. पुणे स्थानकावरून सहा वाजता सुटणारी लोकल देखील सुमारे 15 मिनिटे उशिराने धावली.
तसेच अन्य काही गाड्यांच्या देखील वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी रेल्वेने पुष्टी दिली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.