Dapoli News : आंजर्लेतील समुद्रात पुण्यातील सहा तरुण बुडाले, तिघांचा मृत्यू, तर तिघांना वाचविण्यात यश

एमपीसीन्यूज : रत्नागिरी जिल्ह्यातील दापाेली येथे पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील सहा तरुण आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर पाण्यात खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खाेल पाण्यात बुडाले. यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर तिघांना वाचविण्यात यश आले. आज, शुक्रवारी ही घटना घडली.

अक्षय राखेलकर (वय-25), विकास श्रीवास्तव (24) व मनाेज गावंडे (24) अशी पाण्यात बुडून मयत झालेल्या पुण्यातील पर्यटकांची नावे आहे. तर, निहाल चव्हाण, राेहित पलांडे आणि उबेद खान हे तीनजण या घटनेत वाचले असून त्यांच्यावर दापाेलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सहा तरुण पुण्यातील औंध परिसरातील रहाण्यास असून रत्नागिरी जिल्हयातील दापाेली येथे ते सुट्टी निमित्ताने फिरावयास गेले.

आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर ते पाण्यात पाेहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात गटांगळया खाऊ लागले आणि आरडाओरड करु लागले. त्यामुळे स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता तीनजणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. परंतु, तिघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.

याप्रकरणी दापाेली पाेलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.