dasara celebration : यंदा आळंदीमध्ये मोठया उत्साहात पार पडले सीमोल्लंघन

एमपीसी न्यूज :- कोरोनाच्या काळात शासनाच्या नियम अटी निर्बंधामुळे दोन वर्ष विजयादशमी निमित्त सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाला मर्यादित स्वरूप प्राप्त झाले होते. यंदा मात्र कोरोना संबंधित कोणतेही निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात आळंदीमध्ये सीमाउल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला.
श्री खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघनासाठी माऊलींच्या पालखीचे  सायंकाळी 6 वाजता आगमन झाले.त्यानंतर श्रीराम,श्री नृसिंह स्वामी व श्री भैरवनाथ पालखीचे आगमन झाले.साडे सहा वाजता आपट्यांच्या पानांचे पूजन झाले.आलेल्या सर्व पालख्यांसमोर भजन झाले. श्री खंडोबा व पालखी दर्शनासाठी भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. भजन झाल्यानंतर प्रत्येक पालखीने खंडोबा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करत आपल्या मंदिरा स्थळा कडे प्रस्थान केले. यावेळी येथे
नागरिक एकमेकांना आपट्यांची पान देत गळाभेट घेऊन दसऱ्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देत होते.

खंडोबा मंदिरा पुढे देवस्थानच्या वतीने भव्य मंडप उभारण्यात आला होता. तसेच मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या कार्यक्रमाला संत ज्ञानेश्वर देवस्थान,आळंदी नगरपरिषद,आळंदी पोलीस स्टेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.समस्त आळंदी ग्रामस्थांच्या सौजन्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सायंकाळी पाचच्या सुमारास वरुणराजाने काही वेळ हजेरी लावली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.