Dasara melava : ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

एमपीसी न्यूज : दोन वर्षानंतर आज होणाऱ्या निर्बंधमुक्त दसऱ्याच्या दिवशी सर्वात मोठी चर्चा आहे ती शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्याची (Dasara melava)…. ठाकरे आणि शिंदे गटांनी शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानात जय्यत तयारी सुरू आहे. उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शक्तीप्रदर्शनासाठी राज्यभरातून हजारो वाहनांमधून दाखल होत असलेले दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आणि मेळाव्याआधी रंगलेलं टीझर वॉर….. या पार्श्वभूमीवर कुणाचा मेळावा सरस ठरणार(Dasara melava) आणि कोण कुणावर भारी पडणार याची चर्चा राज्यभरात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणते बाण सोडणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवा धक्का देणार का? याचीही उत्सुकता आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी तोफा धडाडणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या भाषणाआधी 111 साधू संतांकडून शंख नाद होणार असून बीकेसीतील दसरा मेळाव्याला अयोध्येचे महंत उपस्थित राहणार आहेत. सर्व साधूसंतांच्या उपस्थितीत मंत्र पुष्पाजंली अर्पण करत एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जाणार आहे. याशिवाय अयोध्येच्या महंतांना धनुष्यबाण भेट दिले जाणार आहे.

Moshi crime : गोळ्या घालण्याची भाषा करत दहशत पसरवणारा तडीपार भाई गजाआड

बीकेसीवरील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिनेमातील अभिनेत्याप्रमाणे एन्ट्री होणार आहे. स्टेजच्या खालून हायड्रॉलिक पद्धतीने एकनाथ शिंदे वर येणार आहे. हा स्टेज 40 बाय 120 फुटांचा असून दोन्ही बाजूला 15 बाय 20 फुटांच्या दोन एलईडी स्क्रीन लावल्या आहेत.(Dasara melava) हे संपूर्ण मैदान 2600 बाय 250 फूट लांब असून इथे 1 लाख 20 पेक्षा जास्त खुर्च्या लागल्या आहे. त्यात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सेक्शन वेगळे असणार आहेत. संपूर्ण मैदानात शेवटपर्यंत 15 एलईडी स्क्रीन लावल्या आहेत.

 

तर शिवाजी पार्कवर आज होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या मंचावर 25 मान्यवर असतील. हे व्यासपीठ 60 बाय 20 रुंद असून 8 फूट उंच आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी 12 बाय 12 चं स्पेशल रॅम्प आहे. यावेळी जेव्हा उद्धव ठाकरे भाषण करतील तेव्हा त्यांच्यासाठी खास पोडियम असेल.(Dasara melava) यावेळी सगळ्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना उद्धव ठाकरे यांचं भाषण पाहता यावं यासाठी तीन एलईडी स्क्रीन मैदानात तर चार एलईडी स्क्रीन बाहेर लावण्यात आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.