Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीची तारीख जाहीर

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील निवडणूक झालेल्या 57 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठीच्या निवडणूका अखेर बुधवार दि . 24 व गुरूवार दि. 25 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. 

तालुक्यातील पंचवार्षिक मुदत संपलेल्या 57 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडली होती. सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढली होती त्यानुसार यापूर्वी मंगळवार (दि 9) व बुधवार (दि 10) फेब्रुवारी रोजी निवड होणार होती. परंतु परंदवडी येथील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका  दाखल झाल्याने मंगळवार (दि 16) पर्यंत निवडीला स्थगिती दिली होती. अखेर बुधवार (दि 17) रोजी जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र देशमुख यांनी नव्याने आदेश काढून  निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवार (दि 24) व गुरूवार (दि 25) रोजी निवडी होणार आहेत.

▪️ बुधवार दि 24 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणुका

आंबी, आढे, आपटी, उकसान, इंगळुन, करंजगाव, कार्ला, कोथुर्णे, खडकाळा, चिखलसे, नवलाखउंब्रे, माळेगाव बु., मळवली, वेहेरगाव, तिकोणा, येलघोल, टाकवे बुद्रुक, घोणशेत, सोमाटणे, पाचाणे, परंदवडी, साते, मोरवे, थुगांव, शिवणे, महागाव, नाणे, वडेश्वर, सांगावडे.

▪️ गुरूवार दि 25 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणुका

अजिवली, आढले खु, आंबेगाव, उर्से, कशाळ, कांब्रे नामा, कुसगाव बु.,कुसगाव खुर्द, कुसगाव पमा, कुरवंडे, कुसवली, खांड, खांडशी, गहुंजे, गोवित्री, दारूंब्रे, डाहुली, धामणे, ताजे, बौर, पाटण, मळवंडी ठूले, माळवाडी, येळसे, वारू, शिवली, शिरदे, साई.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.