Vadgaon Maval News : पंधराव्या वित्त आयोगात मंजूर निधीपैकी दहा टक्के जिल्हा परिषद, दहा टक्के पंचायत समितीला हिस्सा मिळणार – दत्ता शिंदे

एमपीसी न्यूज – पंधराव्या वित्त आयोगाने मंजूर केलेल्या निधीपैकी दहा टक्के हिस्सा जिल्हा परिषदेला आणि दहा टक्के हिस्सा पंचायत समितीला मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांची समन्वय समितीचे मोठे योगदान आहे, असे तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती दत्ता शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिक बळकट होण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याशी समन्वय साधून जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांची समन्वय समिती स्थापन करण्याची महत्वाची भूमिका दत्ता शिंदे यांनी बजावली आहे. त्यांनी गुरुवारी (दि.13) मावळ पंचायत समितीला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालूका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे,पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. अंकुश देशपांडे, सहा.प्रशासन अधिकारी विठ्ठल भोईर हे उपस्थित होते.

तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती यांनी मावळ पंचायत समितीची इमारत, पंचायत समितीचे सभागृह, इमारतअंतर्गत स्वच्छता व परिसर स्वच्छतेबदल सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे तोंडभरून कौतूक केले. केंद्रशासन व राज्यशासन यांचेकडून15 वा वित्त आयोग निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीस उपलब्ध करतांना कोणत्या अडचणी आल्या याची सविस्तर माहिती दिली.

तसेच इतरही बरेचशा बाबी अतिशय महत्वाच्या असून त्या सोडविण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र शासन यांनी दि 15/1/2022 रोजी सकाळी 9.30 वाजता वेळ दिलेली असून सभापती व उपसभापती यांची मुदत दि 14/3/2022 पासून संपत आहे. त्यांनाच निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ दयावी व प्रलंबित विषयांची चर्चा करणेसाठी माजी सभापती मावळ व सर्व सन्माननीय पदाधिकारी मावळ यांना सदर ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

पंचायत समिती तुळजापूरचे उपसभापती दत्ता शिंदे यांनी केलेल्या कामाचे कौतूक माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम यांनी करत महाराष्ट्रामधील किमान 2000 सन्माननीय सदस्य यांना आपण एकत्रित केले आहे हे आपले कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याबद्दल शिंदे यांचा गौरव करत अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीची वेळ आपण निश्चित केलेली आहे. सदर भेटीच्या वेळी मुद्रांक शुल्क अनूदान (उपकर निधी) गेल्या दोन वर्षापासून मिळालेला नाही. त्यामूळे विकास कामे थांबलेली आहेत. आपण सदर विषयासाठी पाठपुरावा करावा व उपकर निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीस या महिना अखेर पर्यंत
कसा उपलब्ध होईल या साठी प्रयत्न करावेत. अशी विनंती देखील म्हाळसकर व कदम यांनी शिंदे यांना केली आहे.

माजी उपसभापती शांताराम कदम यांनी दत्ता शिंदे, उपसभापती, पंचायत समिती तुळजापूर यांच्या कामाचे कौतूक केले व पुढील कार्याला शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.