Dattawadi : सोनसाखळी चोरट्यांचा शहरात पुन्हा उच्छाद; एका दिवसात चार घटना, तीन महिन्यात 24 घटना

एमपीसी न्यूज : सोन साखळी चोरट्यांनी पुन्हा (Dattawadi) एकदा पुणे शहरात धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी एका तासात चोरट्यांनी चार ठिकाणी महिलांच्या व पादचारी व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्या आहेत. चार घटनांत सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. चालू वर्षात या चोरट्यांचा धुमाकूळ पुन्हा वाढल्याचे पाहिला मिळत आहे. केवळ तीन महिन्यात तब्बल 24 घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत.

याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात 33 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. पर्वती गावात भल्या सकाळी ही घटना घडली असून, तक्रारदार या कचरा टाकण्यासाठी आलेल्या होत्या. त्यावेळी पाठिमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत गळ्यातील 75 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. तर, दुसरा प्रकार कोंढव्यात घडला असून, मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व दागिने असा 1 लाख 35 हजारांचा ऐवज लांबविला आहे.

Pune : अकाउंट बाद होईल म्हणत 2 लाखांना घातला गंडा

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एसबीआय बँकेच्या समोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 50 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तसेच, स्वामी विवेकानंद रस्त्यावर देखील सकाळीच पावणे आठच्या सुमारास 53 वर्षीय पादचारी व्यक्तीच्या गळ्यातील 26 ग्रॅम वजनाची सोन साखळी हिसकावल्याची (Dattawadi) घटना घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. श्रीधर निलय सोसायटीसमोर ही घटना घडली.

सहकारनगर परिसरात चौथी घटना घडली असून, मॉर्निंग वॉकला आलेल्या पादचारी महिलेच्या गळ्यातील तब्बल 1 लाखांचे मंगळसुत्र हिसकावून नेले आहे. शंकर महाराज मठाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात 51 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.