Transformer fire : दत्तवाडी येथे सकाळी ट्रान्सफॉर्मरला लागली आग

एमपीसी न्यूज : दत्तवाडी येथे सकाळी ट्रान्सफॉर्मरला आग लागली. फ्रायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी पोहचण्यापुर्वीच ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा बंद केला होता.(Transformer fire) फोम चा वापर करून आग 10 मिनिटांमध्ये विझवण्यात आली.

याबाबत माहिती देताना, फायरमन सचिन ऐवळे, एरंडवणे अग्निशमन केंद्र, अग्निशमन विभाग, पुणे महानगरपालिका म्हणाले की, आज सकाळी 7.46 वा दत्तवाडी मधील मनपा शाळे जवळील ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती.

PCMC News : थकबाकी असलेल्या निवासी सदनिकांवर टाच, एकाच दिवशी 50 सदनिका सील

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, ट्रान्सफॉर्मर मधून स्पार्कींग सुरू होत.  तसेच ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल ने पेट घेतला होता. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तेथे उपस्थित होते. त्यांनी अग्निशमन गाडी पोहोचण्यापूर्वीच ट्रान्सफॉर्मरचा  विद्युत पुरवठा बंद केला होता.(Transformer fire) फोम चा वापर करून अवघ्या 10 मिनिटांमध्ये आग विझवण्यात आली होती. चालक अमोल शिंदे, फायरमन सचिन ऐवळे, शैलेश दवणे, कमलेश माने, आशुतोष पिंगळे या टीमने आग विझवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.