Dattwadi : ओढ्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोन वर्षाचा चिमुरडा गेला वाहून (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- ओढ्यामधील पाणी अचानक वाढल्याने दोन वर्षाचा चिमुरडा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना बुधवारी (दि. 12) संध्याकाळी दत्तवाडीत परिसरात घडली. संस्कार बंडू साबळे असे या मुलाचे नाव आहे. अग्निशामक दलाकडून या मुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध चालू होता. आज सकाळी पुन्हा शोध सुरु केला असून अद्याप या मुलाचा ठावठिकाणा समजू शकला नाही. 

साबळे कुटुंबीय मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी आहे. ते सध्या पुण्यातील दत्तवाडी येथीलरक्षालेखा सोसायटीत राहत आहेत. खेळात असताना संस्कार हा नाल्यात बुडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ शोधकार्य सुरू केले. अंधार पडल्यामुळे दोन तासांनंतर शोधकार्य थांबवण्यात आले. आज सकाळी परत 13 जवान आणि दोन अधिकाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरु करण्यात आले असून पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. अद्याप या चिमुरड्याचा शोध लागू शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.