Daund Crime News: दौंडजवळ डोक्यात दगड घालून फोटोग्राफरचा खून

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दौंड लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथे असणाऱ्या कालव्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात केदार भागवत यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून आणि बाटली फोडून खून करण्यात आल्याचे घटनास्थळावर दिसून आले.

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात एका फोटोग्राफरचा डोक्यात दगड घालून आणि बाटली फोडून खून करण्यात आला. दौंड-लिंगाळी रस्त्यालगत हा प्रकार घडला. 

केदार श्रीपाद भागवत (वय 46) असे खून झालेल्या फोटोग्राफरचे नाव आहे.

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दौंड लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथे असणाऱ्या कालव्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात केदार भागवत यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून आणि बाटली फोडून खून करण्यात आल्याचे घटनास्थळावर दिसून आले. तसेच मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून दौंड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी सर्व शक्यता विचारात घेऊन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.