Daund Crime News – धक्कादायक ! उसन्या पैशांच्या वसुलीसाठी महिलेवर बलात्कार

एमपीसीन्यूज :  महिलेला उसने दिलेले दीड लाख रुपये वसूल करण्यासाठी एका आरोपीने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड शहरात उघडकीस आला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर दौंड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी तिच्या घरी आला.

‘तुला दिलेले दीड लाख रुपये वसूल करायचे आहेत’, असे म्हणून आरोपीने तिला घरात ढकलले आणि त्यानंतर स्वतः घरात जाऊन घराचा दरवाजा बंद केला. आरोपीने तिला बेदम मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर दौंड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महाडिक करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.