Daund News : रेल्वेखाली उडी मारुन नवविवाहित तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज –  दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात (Daund News) रेल्वेगाडीखाली उडी मारुन नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.19) सकाळी साडे दहा वाजता घडली.

 

 

आदित्य ओव्हाळ (वय 24, रा. आंधळगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यचे दौंड तालुक्यातील पारगाव येथे ओैषध विक्रीचे दुकान आहे. त्याचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.

 

Pimpri Crime News : पिस्टल व गांजासह सराईताला साथीदारासह अटक

 

 

केडगाव परिसरात लोहमार्गावर आदित्यने रविवारी सकाळी इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वेगाडी खाली उडी मारुन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. नवविवाहित आदित्यने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आंधळगाव, पारगाव परिसरातील (Daund News)  ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.