Talegaon News : मुख्य जलवाहिनी फुटल्याने तळेगावातील काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज : तळेगावला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने गाव व स्टेशनच्या काही भागातील पाणीपुरवठा काही दिवस दिवसाआड होणार असल्याची सूचना नगरपालिका प्रशासनाने ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना झाली दिली आहे. 

पवनानदीवरून येणारी 18 इंची जलवाहिनी विजय खिंडीमध्ये गुरुवारी पहाटे फुटल्याने पाणीपुरवठा करण्यामध्ये विस्कळीतपणा आला आहे. पुढील दोन दिवस या जलवाहिनीच्या माध्यमातून गाव भागातील व स्टेशन भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा दिवसा आड होणार आहे.

चौराई डोंगराच्या पायथ्याला असलेल्या साठवण टाक्यामध्ये पवना नदीवरून या जलवाहिनीद्वारे पाणी घेतले जाते. या साठवण टाकीमधून गाव भागात गावठाण, संभाजीनगर, राव कॉलनी, मस्करनेस  कॉलनी,  बत्तीस बंगले, कडोलकर कॉलनी, श्रीनगरी,गणेश कॉलनी, लीलावती,लेक पॅराडाईज, स्वराज नगरी तसेच स्टेशन येथील पुलाच्या अलीकडील भागात पाणीपुरवठा होत असतो. ही जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

विजय खिंडीमध्ये  ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. त्या ठिकाणास नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,सभागृहनेते अरुण भेगडे पाटील, नगरसेविका शोभा भेगडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन काम करणाऱ्या कामगारांना लवकरात लवकर काम पूर्ण करावे. अशा सूचना दिल्या.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.