Pimpri News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाने पक्ष कार्यालयात नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या खासगी सचिव, स्वीय सहाय्यकाने खराळवाडीतील पक्ष कार्यालयात सोमवारी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांचे अर्ज व निवेदने स्वीकारून मार्गदर्शन केले.

खराळवाडीतील पक्ष कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अनेक नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांना भेटून आपल्या विविध समस्या मांडल्या. स्वीय सहाय्यकांनी सर्व नागरिकांचे अर्ज व निवेदने स्वीकारून त्यांना उचित मार्गदर्शन केले. अनेकांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वस्त देखील केले. दरम्यान, शासनदरबारी रखडणारी अनेक कामे मुंबईला न जाताच जलदगतीने होत असल्याने सर्व नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अजितदादांच्या स्वीय सहाय्यकांचे स्वागत केले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, नगरसेविका डॉ.वैशाली घोडेकर, राहुल भोसले,विनोद नढे , फझल शेख, शकुरला पठाण, वर्षा जगताप,पुष्पा शेळके,संगीता कोकणे,गंगा धेंडे, संतोष वाघेरे, अमोलभोईटे, रामेश्वर लाहोटी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.