Pune : लोणी काळभोर जवळील महातोबाची आळंदी परिसरात आढळला मृत बिबट्या

एमपीसी न्यूज – लोणी काळभोर येथील महातोबाची आळंदी परिसरात आज बुधवारी (दि.14) सकाळी सहाच्या सुमारास एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेथील स्थानिकांनी ही बाब पोलिसांना कळविताच वनविभागाचे अधिकारी व लोणी काळभोर पोलीस दाखल घटनास्थळी झाले व त्यांनी पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत आढळला.

लोणी काळभोर येथून काही अंतरावर असलेल्या आळंदी म्हातोबाची या गावातील शिवारात मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबट्या या परिसरात पाण्याचा शोधात आला असण्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला.

याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, आळंदी म्हातोबाची या गावातील शेतकरी शेतात गेला असता त्याला निपचित पडलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. त्याने ही माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी शिवाराकडे धाव घेतली आणि जवळ जाऊन पाहिले असता हा बिबट्या मृत्यमुखी पडल्याचे आढळले. दरम्यान मृतावस्थेत बिबट्या आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक तपासनीअंती पाण्याअभावी या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.