Pune News : मृत कोरोना योद्धे कर्मचाऱ्यांना मिळणार 25 लाखांची मदत!

एमपीसी न्यूज : कोरोना काळात पुणे महापालिकेच्या मृत्युमुखी पडलेल्या 44 मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्यास स्थायी समितीने अखेर आज मंगळवारी मान्यता दिली.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहेत. गत काही महिन्यांपुर्वी कोरोनाच्या काळात कामावर असताना संसर्ग होऊन मरण पावलेल्या कोविडयोद्धयांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये आर्थिक मदत किंवा 25 लाख रुपये मदत आणि घरातील एका व्यक्तीला पालिकेत नोकरी देण्याची घोषणा केली होती

त्यावेळी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी पालिकेने ठराव करून या कर्मचार्‍यांना 1 कोटींचे सुरक्षा कवच देण्याची घोषणा केली होती. त्यात, केंद्राच्या विमा योजनेतून 50 लाख, तर पालिकेकडून 25 लाख आणि एका वारसाला महापालिकेत नोकरी देण्याची घोषणा केली होती. मात्र, हा ठराव करताना तो सप्टेंबर पर्यंत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांसाठीच होता.

त्यामध्ये केंद्राचा विमा या कर्मचार्‍यांना नाकारण्यात आला, तर पालिकेच्या ठरावानुसार, केवळ 15 जणांच्या वारसांनाच महापालिकेस 25 लाखांची मदत देण्यात येणार होती. त्यामुळे प्रशासनाची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे, स्थायी समितीनेच ठराव करून सरसकट सर्व कर्मचार्‍यांना 25 लाखांची मदत देण्याचा प्रस्ताव समितीत ठेवल होता, तो अखेर मान्य करण्यात आला असल्याने कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना मदत मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.