Maval : टाटा डॅममध्ये सावळा ते कशाळ गावादारम्यान मृत माशांचा खच

Dead-fish-found-in-tata-dam-waters-between-savala-to-kashal-village-in-andar-maval

एमपीसी न्यूज – आंदर मावळ परिसरातील टाटा डॅममध्ये सावळा ते कशाळ गावादारम्यान मृत माशांचा खच आढळून आला. त्यामध्ये कासवाचा देखील मृत्यू झाला आहे. हा प्रकार विषबाधेमुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मावळ अॅडव्हेंचर संस्थेचे विश्वनाथ जावळीकर यांनी याबाबत माहिती दिली. गुरुवारी सकाळी आंदर मावळातील सावळा ते कशाळ गावादारम्यान टाटा डॅममध्ये मासे मरत असल्याचा प्रकार समोर आला.

मात्र, उन्हाळ्यामुळे मासे मरत असतील असा अंदाज बांधून त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. मात्र, दुपारी मोठ्या प्रमाणात मासे मरुन पाण्याच्या कडेला आल्याचे दिसले.

त्यानंतर मावळ अॅडव्हेंचर संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. सर्व स्वयंसेवकांनी मृत मासे जमा केले. तर काही माशांना शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले.

हा प्रकार विषबाधेमुळे झाला असून परिसरातील कुणीतरी थायमिठ, पॉलिहाऊसचे  पेस्ट्रीसाईड अथवा अन्य विषारी रसायने पाण्यात टाकली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.