Pune : विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

आतापर्यंत ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी नावनोंदणी

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेतर्फे (open learning school) चालवण्यात येणाऱ्या दूरस्थ शिक्षण (distance education) अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नावनोंदणी केली आहे. या प्रतिसादामुळे अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची मुदत आता १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत वाढविणयात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

विद्यापीठातर्फे या वर्षापासून दूरस्थ अभ्याक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांची प्रवेशप्रक्रिया २७ ऑगस्टपासून सुरू झाली. ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. मात्र, या काळात विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही मुदत आणखी पंधरा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. आता विद्यार्थी अशा अभ्यासक्रमांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेऊ शकतील. त्यासाठी कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. मुक्त अध्ययन प्रशालेच्या http://unipune.ac.in/SOL/ या वेबसाईटद्वार ऑनलाईन प्रवेश घेता येतील, अशी माहिती संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1