Nashik News : बारावी परीक्षा अर्जासाठी 28 जानेवारी पर्यंत मुदत

एमपीसी न्यूज : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे२०२१ महिन्यात बारावीची परीक्षा होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळातर्फे अर्ज प्रक्रियेस तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तीनदा मुदतवाढी नंतर आता पुन्हा विद्यार्थ्यांना १९ ते २८ जानेवारी पर्यंत नियमित शुल्कासह आवेदनपत्र सादर करता येणार आहेत.

व परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांना डेटा बेसवरून तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, गुणवत्ता सुधार व निवडक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही १९ ते २८ जानेवारी २०२१ दरम्यान त ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे असून त्यासाठीचे वेळापत्रकही राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. विलंब शुल्कासह २९ जानेवारी ६ फेब्रुवारीपर्यंत आवेदनपत्र सादर करता येईल. बारावी व दहावी परीक्षा एप्रिल व मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.